jammu narwal blast

जम्मूच्या (Jammu Blast) नरवाल भागात आज सकाळी दोन स्फोट (Two Blaasts In Narwal) झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये 6 जण जखमी (Six Injured) झाले आहेत.

    जम्मू: जम्मूच्या (Jammu Blast) नरवाल भागात आज सकाळी दोन स्फोट (Two Blaasts In Narwal) झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये 6 जण जखमी (Six Injured) झाले आहेत. जम्मूचे एडीजीपी (ADGP)मुकेश सिंह यांनी सांगितलं की, जम्मूच्या नरवाल भागातील दुहेरी स्फोटामध्ये सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. एनआयए या प्रकरणात तपास करुन आणखी माहिती मिळवणार आहे.

    जखमींना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या भागात जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. पुढील तपास सुरु आहे.

    जखमींमध्ये 5  सोहेल कुमार, 26 सुशील कुमार, 25  विशप प्रताप, 52  विनोद कुमार, 25 अरुण कुमार, 40 अमित कुमार आणि 35  राजेश कुमार यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिन तसेच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड नंबर सात आणि नऊवर हे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या भागातील वाहनं हटवण्याचं काम करत आहेत. या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी केली जाणार आहे.