
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केल्यानंतर आज पहिल्यांदाच लोकसभेत बोलले परंतु आता त्यांच्यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आरोप केला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचे पत्र दिले आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचे पत्र दिल्याची माहिती आहे.
Rahul Gandhi Flying Kiss Controversy : आज खासदारकी बहाल केल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेत राहुल गांधी बोलले, यावेळी त्यांनी मणिपूरवरून भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी सभागृहात भाजपच्या महिला खासदाराला फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणींनी केल्याने राहुल गांधींच्या अडचणी वाढणार आहेत. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.
#WATCH | Union Minister Smriti Irani on Congress MP Rahul Gandhi
"Never before has the misogynistic behaviour of a man been so visible in Parliament as what was done by Rahul Gandhi today. When the House of the People, where laws are made to protect the dignity of women, during… pic.twitter.com/eOsMl3I5zy
— ANI (@ANI) August 9, 2023
राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिले आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप
संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.
राहुल गांधींवर कारवाई संबंधी चर्चा
लोकसभेमध्ये कथितरित्या फ्लाईंग किस दिल्याप्रकरणी राहुल गांधांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा सचिवालयाती ही माहिती दिली आहे. राहुल गांधींवर काय कारवाई केली पाहिजे, यावर सध्या विचार सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं समजतंय.