एटीएममधून नोटांऐवजी निघाली चक्क सापांची पिल्ले; पुढं झालं असं काही…

उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एसबीआयच्या एटीएममधून (SBI ATM) पैशांऐवजी सापाची पिल्ले निघाल्याने खळबळ उडाली आहे. एटीएममधून साप (Snake Found in ATM) बाहेर आल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

    रामनगर : उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एसबीआयच्या एटीएममधून (SBI ATM) पैशांऐवजी सापाची पिल्ले निघाल्याने खळबळ उडाली आहे. एटीएममधून साप (Snake Found in ATM) बाहेर आल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. बुधवारी सायंकाळी रामनगर येथील कोसी रोडवर असलेल्या स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएममधून साप निघाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.

    याबाबत एटीएममध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षक नरेश दलकोटी यांनी सांगितले की, संध्याकाळी काही लोक एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते. एका व्यक्तीने आपले एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकताच त्याला मशीनच्या तळाशी साप दिसला. त्यानंतर घाबरलेल्या व्यक्तीने एटीएममधून बाहेर पडून गार्डला याची माहिती दिली. बाहेर उभ्या असलेल्या लोकांना याची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

    सापांची सुखरूप सुटका

    या घटनेची माहिती मिळताच स्टेट बँकेच्या शाखेत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ‘सेव्ह द स्नेक अँड वेलफेअर’ सोसायटीचे अध्यक्ष चंद्रसेन कश्यप आणि सर्पतज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एटीएमच्या आत तपासणी सुरू केली असता त्यांना एटीएममध्ये सापाची पिल्ले आढळून आली. तेथून एकामागून एक दहा सापांची पिल्ले बाहेर आली, ज्यांना वाचवून जंगलात सुखरूप सोडण्यात आले.