Snake puppies cooked with nutritious food in Karnataka; 50 students hospitalized due to poisoning

पोषण आहारात सापाचे पिल्लू शिजल्याने निवासी शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यांना रुण्गालयात दाखल करण्यात आले. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे(Snake puppies cooked with nutritious food in Karnataka; 50 students hospitalized due to poisoning).

    यादगीर : पोषण आहारात सापाचे पिल्लू शिजल्याने निवासी शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यांना रुण्गालयात दाखल करण्यात आले. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे(Snake puppies cooked with nutritious food in Karnataka; 50 students hospitalized due to poisoning).

    ही घटना अब्बे तुमकूर विश्वाध्याय विद्यावर्धन निवासी स्कूलमध्ये घडली. पोषण आहार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी व्हायला लागली. यातील 50 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 12 आणि 15 वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना वगळता इतराना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली.

    पोषण आहारात शिजवलेले नाश्ता करीत असताना विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला लागल्या. सदर दृश्य बघून शाळेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अन्न देणे बंद केले व मुदनाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या दरम्यान अन्नाची पाहणी केली असता त्यात मेलेल्या सापाचे पिल्लू आढळून आले. यामुळे विद्यार्थ्यांना उलटी होत असल्याचे लक्षात आले. पोषण आहार बनविताना सावधगिरी बाळगण्यात येत असतानाही असा प्रकार कसा घडला यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.