सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे

सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या नातेवाईकांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले होते.

    भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या मागणी नंतर आता या तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला आहे.

    सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज काहीतरी नवी माहिती समोर येत आहे. काही दिवसापुर्वी गोव्यातील कर्लिज हॉटेलच्या मालकासह ड्रग्ज पेडलरला करण्यात आली होती. त्यानंतर हे कर्लिज हॉटेल सील करण्यात आलं. आता या प्रकणाचा तपास सीबीआय करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान, सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या नातेवाईकांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले होते. ‘गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’ असं त्यांनी नमूद केलं होतं.