सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज कोविड संबंधित त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली(Sonia Gandhi Admitted In Hospital ).

    दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज कोविड संबंधित त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली(Sonia Gandhi Admitted In Hospital ).

    सोनिया गांधी यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून हळूहळू त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत होती, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारीरुग्णालयात दाखल करण्यात आले.

    नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी 8 जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी या तारखेला ईडी कार्यालयात पोहोचल्या नाहीत.