सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज, नॅशनल हेराल्ड प्रकरणी २३ तारखेला ED पुढे हजेरी

नॅशनल हेराल्ड ( National Herald ) प्रकरणात ७५ वर्षीय सोनियांची २३ जून रोजी चौकशी होणार आहे. सध्या या प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणी सोनियांना नवा समंस जारी करुन २३ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

    नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  सोमवारी घरी परतल्या. त्यांना २ जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर गत १२ तारखेला नाकातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधींच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात फंगल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे गुरूवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होते. काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांच्या डिस्चार्जची (discharged from hospital)  माहिती दिली.

    नॅशनल हेराल्ड ( National Herald ) प्रकरणात ७५ वर्षीय सोनियांची २३ जून रोजी चौकशी होणार आहे. सध्या या प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणी सोनियांना नवा समंस जारी करुन २३ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ईडीने यापूर्वी ८ जून रोजी सोनियांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी तपास यंत्रणेला नवी तारीख देण्याची विनंती केली होती.