आदित्य ठाकरेंबाबत बोलताना महंतांची जीभ घसरली

    शिवसेना नेते (Shivsena Leader) तथा मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज सकाळी अयोद्धेला (Ayoddhya Tour) दाखल झाले आहेत. याबाबत राजकारणासह सर्वच क्षेत्रातील प्रतिक्रीयांना उधाण आले आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा एक बिगर राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगितले. तर, हनुमानगढीचे ज्येष्ठ संत महंत राजू दास (Saint Raju Das ) यांची बोलताना जीभ घसरली (Tongue Slipped) आहे. रामायणातील राक्षस (Monster) असलेल्या ‘कालनेमी’ची (Kalnemi) उपमा दिली आहे. तसेच, ठाकरेंचा हा कार्यक्रम राजकीय नाही, तर मग संपूर्ण अयोध्या बॅनर पोस्टर्सने का भरली आहे.

    ज्या सरकारमध्ये हनुमान चालीसा वाचणाऱ्याला १४ दिवस तुरुंगात घालवावे लागतात. त्या व्यक्तीवर सरकारकडून दहशतवाद्यांप्रमाणे खटले चालवले जातात. असे लोक अयोध्येत येऊन मगरीचे अश्रू का ढाळत आहेत? अशा कालनेम्यांपासून समाजाने सावध राहण्याची गरज आहे. हा केवळ राजकीय स्टंट आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे अयोध्येत येत आहेत. ते भक्त म्हणून अयोध्येत आले असते तर, त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले असते. मात्र, अशा घटनांपासून समाजाने सावध राहण्याची गरज आहे. सोमवारी सरयू घाटावर उपस्थित असूनही संजय राऊत सरयू आरतीला उपस्थित राहिले नाहीत. याचा अर्थ काय, हे समजून घ्यायला हवे, असे महंत राजू दास म्हणाले.