शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ; पेटीएम सावरला

राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 87 अंकाच्या (0.5%) तेजीसह 17,503 वर स्थिरावला. दोन दिवसात 39 टक्क्यांनी गडगडल्यानंतर पेटीएमचा शेअर 9.9% तेजीसह 1494 सरुपयांवर स्थिरावला.

    मुंबई. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ पहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेंसेक्स 198 अंक म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या तेजीसह 58,664 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 87 अंकाच्या (0.5%) तेजीसह 17,503 वर स्थिरावला. दोन दिवसात 39 टक्क्यांनी गडगडल्यानंतर पेटीएमचा शेअर 9.9% तेजीसह 1494 सरुपयांवर स्थिरावला.

    तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात सुरू होताच घसरण नोंदविली गेली. आयटी, बँक आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला मोठा फटका बसल्यामुळे शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. दिवसाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 482 अकांनी कोसळला. तर दुसरीकडे निफ्टी 17300 अंकांपेक्षा खाली आला होता. मात्र, दिवसअखेर आलेल्या तेजीमुळे शेअर बाजार वधारून बंद झाला.