strawberry moon

स्ट्रॉबेरी मून(Strawberry Moon) हे अमेरिकेतील (America) एक स्थानिक नाव (Local Name) आहे. जगातील विविध देशांमध्ये या चंद्राला विविध नावांनी ओळखलं जाते. युरोपमध्ये स्ट्रॉबेरी मून हा रोज मून नावाने ओळखला जातो.

  नवी दिल्ली : उद्या अर्थात २४ जून रोजी आकाशात खगोलशास्त्रीयदृष्ट्या (Astronomy)    एक वेगळाच करिष्मा अनुभवता येणार आहे. उद्या चंद्र स्ट्रॉबेरीसारख्या रंगाचा दिसणार आहे. जूनमधील पौर्णिमेला या स्ट्रॉबेरी मूनचं (Strawberry Moon) दर्शन घडत आहे. स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय हे जाणून घेऊयात.

  ग्रीष्म संक्रातीनंतरची पहिली पौर्णिमा २४ जूनला आहे. यावेळी खगोलशास्त्रीयदृष्ट्या अनोखी घटना आकाशात घडणार आहे. महत्वाचं म्हणजे ती अनुभवता देखील येणार आहे.

  उद्या आकाशात चंद्र स्ट्रॉबेरी रंगामध्ये दिसणार आहे. या खगोलीय घटनेला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात. या दिवशी चंद्राचा आकार मोठा आणि रंग (Colour) काहीसा स्ट्रॉबेरी सारखा असेल. जून महिन्यातील पौर्णिमेला दिसणाऱ्या अशा चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हणतात. काही ठिकाणी या चंद्राला हॉट मून (Hot Moon) किंवा हनी मून (Honey Moon) असं म्हणतात.

  यावेळी चंद्र आपल्या कक्षेतून पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने तो सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्याला चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं म्हटलं जातं.

  नाव का पडलं ? महत्त्व काय ?

  स्ट्रॉबेरी मून हे नाव प्राचीन अमेरिकी आदिवासींनी दिलेलं आहे. या आदिवासींच्या म्हणण्यानुसार, अशा पूर्ण चंद्राचं दर्शन झाल्याने तो दिवस पौर्णिमेचा समजला जातो आणि स्ट्रॉबेरी कापणीस सुरुवात केली जाते. खरंतर, स्ट्रॉबेरी मून हे अमेरिकेतील (America) एक स्थानिक नाव (Local Name) आहे. जगातील विविध देशांमध्ये या चंद्राला विविध नावांनी ओळखलं जाते. युरोपमध्ये स्ट्रॉबेरी मून हा रोज मून नावाने ओळखला जातो. हा चंद्र युरोपात गुलाब कापणीचं (Rose Harvesting) प्रतिक समजला जातो. उत्तर गोलार्धात हा चंद्र हॉट मून म्हणून ओळखला जातो. कारण हा चंद्र विषुववृत्ताच्या उत्तरेस उन्हाळा सुरु झाल्याचं सूचित करतो. त्यामुळे या भागात असा चंद्र उन्हाळा प्रारंभाचं (Summer Season) प्रतिक मानलं जातं.

  स्ट्रॉबेरी मून हा सामान्यतः वसंत ऋतूतील शेवटच्या पौर्णिमेला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला दिसतो. त्याला ब्लूमिंग मून, ग्रीन कॉर्न मून, होर मून, बर्थ मून, अंडी देणारा मून किंवा हॅचिंग मून, हनी मून किंवा मीड मून असं देखील म्हणतात. स्ट्रॉबेरी मून एका रात्रीपेक्षा अधिक काळापर्यंत दिसू शकतो.

  हिंदु पंचांगानुसार, स्ट्रॉबेरी मून वसंत ऋतूची शेवटची पौर्णिमा आणि ग्रीष्म ऋतूची पहिली पौर्णिमा यांचं प्रतिक मानलं जातं.