गुजरातमध्ये दोन समाजांमध्ये संघर्ष, कॉन्स्टेबलसह चार जण जखमी

शहरात प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास एका समाजाचे काही लोक वादग्रस्त भूखंडावर विटा टाकत होते. इतर समाजाच्या काही लोकांनी याला विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. नंतर वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली.

    नवी दिल्ली : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात जातीय संघर्षात एक पोलीस हवालदार आणि अन्य तीन जण जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, शनिवारी रात्री बोरसद शहरात वादग्रस्त भूखंडावरून झालेल्या हाणामारीच्या संदर्भात पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक डी.आर. पटेल म्हणाले की, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी ५० अश्रुधुराच्या गोळ्या आणि ३० रबर गोळ्या झाडल्या.

    शहरात प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास एका समाजाचे काही लोक वादग्रस्त भूखंडावर विटा टाकत होते. इतर समाजाच्या काही लोकांनी याला विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. नंतर वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. ते म्हणाले की, माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही समाजातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
    पटेल म्हणाले की, दोन्ही समुदायांचे लोक एकमेकांवर भिडले आणि दगडफेक करू लागले. या हिंसाचारात एक पोलीस हवालदार आणि अन्य एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आले आणि अन्य दोघे जखमी झाले. दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या, असे ते म्हणाले. पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून, त्याला आणि इतर तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत किमान 14 जणांना अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. पोलिसांनी शहरातील 15 संवेदनशील ठिकाणे ओळखली असून, तेथे कडक बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) दोन कंपन्यांनाही बाधित भागात सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.