प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी, खरगपूर यांच्यातर्फे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी(JEE Advance Exam 2021) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र(Admit Card For JEE Advance Exam 2021) मिळणार आहे.

    जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी(JEE Advance Exam 2021) प्रवेशपत्र विद्यार्थांना आता डाऊनलोड करता येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी, खरगपूर यांच्यातर्फे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी(JEE Advance Exam 2021) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र(Admit Card For JEE Advance Exam 2021) मिळणार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवेशपत्र ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच मिळणार आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशीलमध्ये भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल. JEE Advanced 2021 Admit Card विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्याशिवाय विद्यार्थाला परीक्षेला देखील बसता येणार नाही.

    प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचे केंद्र, नंबर आणि अधिकची माहीती असणार आहे. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहीती असणार आहे. त्यामध्ये पालकाचे नाव, विद्यार्थीचे संपूर्ण नाव जेईई मेनचा रोल नंबर, अ‍ॅडव्हान्सचा रोल नंबर, सेंटर कोड, फोटो, वेळ, तारीख, पत्ता असेल.

    असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र – सर्वात अगोदर या jeeadv.ac.in वेबसाइटवर जा. JEE Advanced 2021 Admit Card वर जाऊन नोंदणी क्रमांक आणि आपली जन्मतारीख टाका. लॉगिन करा. पुढे तिथे तुम्हाला जेईईचे अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे प्रवेशपत्र दिसेल. प्रवेशपत्रावरील सर्व माहीती चेक करून ते डाऊनलोड करा.