IIT मद्रासमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; एक जण ताब्यात

या घटनेत मुलगी जखमी झाली. याप्रकरणी पीडित मुलीच्या विद्यार्थीमित्राने या घटनेची तक्रार दिली होती. मैलापूर पोलिसांनी मुलीचा अधिक तपास केला. या प्रकरणी चेन्नईच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी थेट आयआयटी कॅम्पसमध्ये जाऊन तपास केला.

    चेन्नई: IIT मद्रास कॅम्पसमध्ये २४  जुलैच्या मध्यरात्री एक विद्यार्थिनी सायकलने वसतिगृहात परतत होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला अडवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केली: मात्र तिच्या हाकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही.

    या घटनेत मुलगी जखमी झाली. याप्रकरणी पीडित मुलीच्या विद्यार्थीमित्राने या घटनेची तक्रार दिली होती. मैलापूर पोलिसांनी मुलीचा अधिक तपास केला. या प्रकरणी चेन्नईच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी थेट आयआयटी कॅम्पसमध्ये जाऊन तपास केला. सध्या आयआयटी कॅम्पसमधील ज्यूसचे दुकान चालवणाऱ्या बिहारमधील संतकुमार (वय २४) नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.