एएससीआयकडून २०२२ साठी सहामाही तक्रार अहवाल सादर; शिक्षण क्षेत्र व प्रभावक उल्‍लंघनांमध्‍ये अग्रस्‍थानी

९८ टक्‍के ग्राहकांच्या तक्रारी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-आधारित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा ताराद्वारे (TARA) प्राप्त झाल्या आहेत. तारासह ग्राहकांना सर्वसमावेशक, त्रासमुक्त निवारण प्रक्रिया मिळाली आहे. नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास १६ टक्‍के तक्रारी ग्राहकांकडून होत्या.

  • तक्रारींमध्‍ये १४ टक्‍के वाढ; एएससीआयची नवीन तक्रार व्‍यवस्‍थापन यंत्रण तारावर (TARA) ९८ टक्‍के तक्रारींची नोंद
  • वैयक्तिक काळजी, अन्‍न व पेये, आरोग्‍यसेवा ही आहेत इतर चिंतादायक क्षेत्रे

नवी दिल्ली : अ‍डव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ने आपला सहामाही तक्रार अहवाल (एप्रिल ते सप्टेंबर, २०२२) जारी केला. या कालावधीत एएससीआय कोडचे (ASCI Code) संभाव्य उल्लंघन करणाऱ्या २७६४ जाहिरातींविरुद्ध ३,३४० तक्रारींवर प्रक्रिया करण्यात आली. यातील जवळपास ५५ टक्‍के जाहिराती डिजिटल डोमेनवर पाहिल्या गेल्या, त्यानंतर ३९ टक्‍के प्रिंट आणि ५ टक्‍के दूरदर्शनवर पाहिल्‍या गेल्‍या.

२०२१-२२ च्या तुलनेत Advertising Standards Council of India ने तक्रारींच्या संख्येत १४ टक्‍के वाढ पाहिली, तर प्रक्रिया केलेल्या जाहिरातींच्या (Advertisement) संख्येत ३५ टक्‍के वाढ झाली. २७ टक्‍के तक्रारींसह शिक्षण हे सर्वात उल्लंघन करणारे क्षेत्र राहिले – २२ टक्‍के अभिजात शिक्षण श्रेणीतील, तर ५ टक्‍के एडटेक क्षेत्रातील आहेत. त्यानंतर वैयक्तिक काळजी (१४ टक्‍के), अन्न व पेये (१३ टक्‍के), आरोग्यसेवा (१३ टक्‍के) आणि गेमिंग (४ टक्‍के) यांचा समावेश आहे. एएससीआयचे सर्व्‍हायलन्‍स प्रबळ आहे, जेथे जवळपास ६५ टक्‍के जाहिरातींनी स्‍वत:हून प्रक्रिया केली आहे.

९८ टक्‍के ग्राहकांच्या तक्रारी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-आधारित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा ताराद्वारे (TARA) प्राप्त झाल्या आहेत. तारासह ग्राहकांना सर्वसमावेशक, त्रासमुक्त निवारण प्रक्रिया मिळाली आहे. नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास १६ टक्‍के तक्रारी ग्राहकांकडून होत्या, त्यानंतर १५ टक्‍के सरकारकडून, तर उद्योगांतर्गत तक्रारी ३ टक्‍के होत्या. प्रक्रिया केलेल्या २,७६४ संभाव्य आक्षेपार्ह जाहिरातींपैकी ३२ टक्‍के जाहिराती जाहिरातदारांनी लढवल्या नाहीत, ५९ टक्‍के जाहिराती एएससीआय कोडचे उल्लंघन करताना आढळल्‍या आणि ८ टक्‍के जाहिराती कोडचे उल्लंघन करत नसल्याचे आढळले.

एएससीआयच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी व महासचिव मनिषा कपूर म्‍हणाल्‍या, “डिजिटल जाहिरातींची होणारी जलद वाढ पाहता आम्ही जाहिरात-सर्व्‍हायलन्‍स तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आम्ही ग्राहक, ब्रॅण्‍ड व सरकारी संस्थांसोबत सहयोगाने सर्व भागधारकांना अधिक प्रतिसाद देणारे व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आमच्या प्रक्रिया अपग्रेड आणि सुव्यवस्थित करत राहू. आमच्‍या पारदर्शक प्रयत्‍नांसह आम्ही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एएससीआयने कोणत्या प्रकारच्या तक्रारी आणि परिणामांकडे लक्ष दिले आहे याबद्दल एक सर्वसमावेशक अहवाल जारी केला आहे.”

एएससीआयला प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी २८ टक्‍के उल्लंघन प्रभावकर्त्यांकडून होते. प्रभावकांच्या विरोधात प्रक्रिया केलेल्या ७८१ तक्रारींपैकी ३४ टक्‍के वैयक्तिक काळजी श्रेणीतील, त्यानंतर १७ टक्‍के वर अन्न व पेये आणि १० टक्‍के व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता आहेत.

अहवालाचा एक भाग म्हणून एएससीआयने हाताळलेल्या प्रकरणांची, तसेच गैर-अनुपालक प्रभावक आणि ब्रॅण्‍ड्सची यादी देखील प्रकाशित केली.