
एक्सप्लोरेशन कंपनी आपल्या बिकिनी स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात डिलिव्हरी करण्याची व्यवस्थेची पडताळणी करणार आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे.
चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नंतर इस्रोने सौर मिशन (Adity L1) यशस्विरित्या पार पाडलं. आता इस्रोच्या या यशस्वी वाटचालीमध्ये आणखी नव्या मिशनची भर पडणार आहे. इस्रो पुढील वर्षी जानेवारीमध्ये मिशन बिकिनी (Isro Misson Bikini) लाँच करणार आहे. बिकिनी हे युरोपियन स्पेस स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एंट्री वाहन आहे. याला रॉकेटच्या साहय्यानेएका विशिष्ट उंचीवर नेऊन सोडण्यात येईल. त्यानंतर हे वाहन पृथ्वीवर परत येणार आहे.
हे सुद्धा वाचा
मिशन बिकीनी म्हणजे काय?
बिकिनी हे युरोपीय अंतराळ यान असून युरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एंट्री वाहन आहे. बिकिनी ही खरंतर या कंपनीच्या मोठ्या पुन: वापरण्यायोग्य री-एंट्री मॉड्यूल Nyx ची एक छोटी आवृत्ती आहे.
इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे अंतराळात झेपावणार आहे. हे रॉकेट बिकिनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटर वर घेऊन जाईल आणि ते सोडेल. तेथून ते पृथ्वीवर परत येईल. यादरम्यान, त्याच्या पुन्हा प्रवेशाबाबत अनेक तपासण्या केल्या जातील. ते वातावरण ओलांडून समुद्रात पडेल. बिकिनीचे वजन फक्त 40 किलो आहे. त्याचा उद्देश अंतराळात डिलिव्हरी करणे हा आहे.
म्हणजेच, एक्सप्लोरेशन कंपनी आपल्या बिकिनी स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात डिलिव्हरी करण्याची व्यवस्थेची पडताळणी करणार आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. यामुळे अंतराळात कोणत्याही मालाची डिलिव्हरी करणे सोपे होणार आहे.
मोहिमेत POEM चा वापर केला जाईल
या मोहिमेदरम्यान एक्सप्लोरेशन कंपनीला प्राप्त होणारा डेटा त्यांना भविष्यात चांगले री-एंट्री आणि रिकव्हरी तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करेल. PS4, PSLV रॉकेटमधील चौथा टप्पा, अलीकडे PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) साठी वापरला गेला.