भारत अन् पाकिस्तानमध्ये साखरेचे दर वाढले, काय कारणे आहेत? : जाणून घ्या सविस्तर

गेल्या १५ दिवसांत साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७, ७६० रुपये (४५४.८० डॉलर) प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च आहेत.

  देशात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. डाळी, तांदूळ, गहू, हिरव्या भाज्यांनंतर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७, ७६० रुपये (४५४.८० डॉलर) प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च आहेत. विशेष म्हणजे साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या ६ वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे.

  चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हा सर्वोच्च दर आहे.

  जूनमध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर हे 42 रुपये किलो होते. तर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे दर 44 रुपयांवर गेले होते. तर आता चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बॉम्बे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.

  …तर साखर आणखी महाग होण्याची शक्यता

  पीक हंगाम 2023-24 मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतात, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

  साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता

  दरम्यान, साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शेतीमालाचे दर पाडण्यासाठी निर्णय घेत आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा, तांदूळ या शेतमाल उत्पादकांना फटका बसला आहे. आता साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेवर साठे मर्यादा (स्टॉक लिमिट) लावण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत.