351 crore found with Congress MP Dheeraj Sahu
351 crore found with Congress MP Dheeraj Sahu

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकून ३५१ कोटी रुपये जप्त केले आहेत. जवळपास ४ दिवस त्यांच्या पैशांची मोजणी सुरू होती.

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटो ट्विट करीत कॉंग्रेस खासदार धीरज साहू यांची मालमत्ता दाखवली होती. प्राप्तिकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकून तब्बल ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. नोटा मोजताना मशीन अनेकदा बंद पडल्या. हा बेहिशेबी पैसा साहू आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग समूह, वितरक आणि अन्य लोकांनी देशी दारुच्या विक्रीतून मिळवल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आहे. याआधी देशात कधीही कोणत्याही विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केलेली नव्हती.

  आतापर्यंत कोणती कागदपत्रे जप्त आली

  धाडी टाकताना तिथे हजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब प्राप्तिकर विभागाकडून नोंदवले जातील. त्यानंतर प्राप्तिकर विभाग कंपनीचे मुख्य प्रवर्तकांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगेल. साहू यांच्या घरातून नेमकी किती रोकड आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

  जाणून घ्या जप्त करण्यात आलेल्या पैशाचे होते काय

  घरात मोठ्या प्रमाणात रोकड किंवा काळा पैसा सापडल्यास नेमकं काय होतं, त्या पैशांचं नेमकं काय केले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. सरकारी विभागांनी धाड टाकून जप्त केलेली रक्कम काळा पैसा असेलच असे नाही. पण काळ्या पैशांचे व्यवहार रोख रकमेच्या स्वरुपातच होतात. अनेक व्यावसायिक त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड ठेवतात. तुमच्या घरात प्राप्तिकर विभागाची धाड पडल्यास आणि त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यास तुम्हाला त्या पैशांच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल. तुम्हाला पैशांचा स्रोत न सांगता आल्यास प्राप्तिकर विभाग ती रोकड जप्त करेल. अशा प्रकरणात तुम्हाला १३७ टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागेल.

  या कारणाने पैसा परत मिळणार नाही

  जप्त झालेल्या रोख रकमेपैकी ६० टक्के पैसा धीरज साहू यांना परत केला जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना हा पैसा कर न भरता मिळवल्याचं सिद्ध करावं लागेल. घरात आणि संबंधित ठिकाणांवर सापडलेली रोकड अवैध माध्यमातून गोळा केला ही बाब सिद्ध झाल्यास किंवा हा पैसा आपल्या उद्योगातून मिळवला असल्याचं सिद्ध करण्यात साहू अपयशी ठरल्यास त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कलमांतर्गत खटला दाखल होईल. त्यानंतर त्यांना पैसा परत मिळणार नाही.