राहुल गांधींना लग्नासाठी हवीये ‘कशी’ मुलगी, राहुल यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले –  एकच अट आहे, ती…

यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राहूल गांधी यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. ते उत्तर प्रदेशातून आले होते. वडिलांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरी सामान्य जेवण तयार होते. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मी अनेक वर्षे सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिकलो.

    नवी दिल्ली – राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जेवण, लग्न, पहिली नोकरी व कुटुंबाच्या मुद्यावर स्पष्टपणे बोलले. ते एका मुलाखतीत म्हणाले की, माझा लग्नाला विरोध नाही. योग्य मुलगी मिळेल तेव्हा मी लग्न करेल. त्यांनी यावेळी आपल्या पहिल्या नोकरीवरही भाष्य केले. मी पहिली नोकरी लंडनच्या मॉनिटर कंपनीत केली, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी ही मुलाखत भारत जोडो यात्रेत यूट्यूब चॅनल कर्ली टेल्सच्या काम्या जानीला दिली. राहुल यांची ही मुलाखत रविवारी रिलीज होईल. त्यात राहुल यांनी काही मजेदार किस्सेही सांगितले.

    यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राहूल गांधी यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. ते उत्तर प्रदेशातून आले होते. वडिलांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरी सामान्य जेवण तयार होते. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मी अनेक वर्षे सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिकलो. तिथे मी इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर हार्वर्ड यूनिव्हर्सिटीला गेलो. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी अमेरिकेच्या रोलिन्स कॉलेजला गेलो. तिथे मी आंतरारष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्राचा अभ्यास केला. कँब्रिज विद्यापीटातून मी पदव्युत्तर पदवी घेतली.

    योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करेल
    लग्नाविषयी बोलतांना राहूल गांधी म्हणाले, जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करेल. एकच अट आहे, ती हुशार असली पाहिजे. माझ्या आई-वडिलांचे लग्न शानदार राहिले. त्यामुळे लग्नाविषयी माझे विचार खूप चांगले आहेत. मी सुद्धा अशाच एखाद्या जीवनसाथीचा शोध घेत आहे.

    वडिलांच्या मृत्यूनंतर फरक पडला
    मी राजकीय कुटुंबातून येतो. आम्ही लहान होतो, तेव्हा डायनिंग टेबलवर राजकारणाचे विविध मुद्दे, भारत व त्यावेळी सुरू असणाऱ्या सर्वच गोष्टींवर चर्चा केली जात होती. वडिलांच्या मृत्यूनंतर थोडा फरक पडला. आजीच्या मृत्यूनंतरही असेच सर्वकाही बदलले होते.