बंदूक घेऊन बँक लुटण्यासाठी पोहोचला साधू, मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज न मिळाल्याने होता नाराज

तामिळनाडूच्या थिरुवरुर येथे ही घटना घडली आहे. साधूचे नाव थिरमलाई स्वामी आहे. ते थिरुव्हरूर जिल्ह्यातील मुलंगुडी गावात ईदी-मिनाल (थंडर अँड स्टॉर्म) संगमम चालवतात. त्यांची मुलगी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेते. तिच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी तो सिटी यूनियन बँकेत गेला होता. पण तेथील कर्मचाऱ्याने कर्जासाठी प्रॉपर्टी पेपरची मागणी केली.

    नवी दिल्ली – बँकेने कर्जाचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे संतप्त झालेल्या एका साधूने बंदूक घेऊन थेट बँक लुटण्याची धमकी दिल्याची घटना तामिळनाडूत घडली आहे. या साधूला मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज हवे होते. पण बँकेने त्याचा कर्ज प्रस्ताव फेटाळला. यामुळे हा साधू एवढा संतप्त झाला की तो बंदूक घेऊन थेट बँकेतच पोहोचला. पण पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्याने पुढील प्रसंग टळला. विशेष म्हणजे या घटनेचे या साधूने फेसबुक लाइव्हही केले.

    तामिळनाडूच्या थिरुवरुर येथे ही घटना घडली आहे. साधूचे नाव थिरमलाई स्वामी आहे. ते थिरुव्हरूर जिल्ह्यातील मुलंगुडी गावात ईदी-मिनाल (थंडर अँड स्टॉर्म) संगमम चालवतात. त्यांची मुलगी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेते. तिच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी तो सिटी यूनियन बँकेत गेला होता. पण तेथील कर्मचाऱ्याने कर्जासाठी प्रॉपर्टी पेपरची मागणी केली.

    यावर साधूने विचारले की, बँकेला पैसे व्याजासह परत मिळत आहेत. मग प्रॉपर्टीचे दस्तावेज कशासाठी मागितले जात आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला. तसेच कर्ज देण्यासही नकार दिला. त्यामुळे साधूचा पारा चांगलाच चढला. तो घरी आला आणि बंदूक घेऊन थेट बँकेत पोहोचला. हे पाहून सर्वजण थक्क झाले. साधूने प्रथम अधिकाऱ्यांपुढे धुम्रपान केले. त्यानंतर रायफल दाखवून धमकावणे सुरू केले.