काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, बिहारच्या मजुरांवर ग्रेनेड हल्ला; १ ठार, २ जखमी

अतिरेक्यांनी ज्या मजुरांवर हल्ला केला, ते गदुरा गावच्या एका टेंट हाऊसमध्ये काम करत होते. हल्ल्यावेळी ते सूती चादर बनवत होते. मागील २ महिन्यांपासून खोऱ्यात अतिरेक्यांचे एन्काउंटर सुरू आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगच्या घटनांत घट झाली होती.

    नवी दिल्ली – पुलवामाच्या गदुरा भागात अतिरेक्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यात बिहारच्या एका मजुराचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले. जम्मू काश्मीर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला आहे. मोहम्मद मुमताज असे मृताचे नाव आहे. मोहम्मद आरिफ व मोहम्मद मजबूल हे पितापुत्र या हल्ल्यात जखमी झालेत. हे सर्वजण बिहारचे रहिवासी आहेत.

    अतिरेक्यांनी ज्या मजुरांवर हल्ला केला, ते गदुरा गावच्या एका टेंट हाऊसमध्ये काम करत होते. हल्ल्यावेळी ते सूती चादर बनवत होते. मागील २ महिन्यांपासून खोऱ्यात अतिरेक्यांचे एन्काउंटर सुरू आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगच्या घटनांत घट झाली होती. पण गुरूवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे अतिरेकी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    गत बुधवारी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या अलोचीबाग धरण भागात अतिरेक्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला होता. पण त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते.