
खासगी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रजा रोखीकरण (लिव्ह एनकॅशमेंट) कराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या 'लिव्ह एनकॅशमेंट'वर (Leave Encashment) कोणताही कर भरावा लागणार नाही.
नवी दिल्ली : खासगी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रजा रोखीकरण (लिव्ह एनकॅशमेंट) कराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या ‘लिव्ह एनकॅशमेंट’वर (Leave Encashment) कोणताही कर भरावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 3 लाख रुपये होती. मात्र, आता 25 लाख रुपयांपर्यंत मर्यादा (Tax Pay) करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या तीन प्रकारच्या रजा असतात. त्यात प्रासंगिक रजा (CL), वैद्यकीय रजा (ML) आणि सशुल्क किंवा अर्जित रजेचा (PL) समावेश होतो. सशुल्क रजा म्हणजे, जी नंतर कॅश केली जाऊ शकते. पण नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतरच कॅश केले जाते. खाजगी कंपन्या सुट्ट्यांच्या संख्येवर मर्यादा घालतात. लिव्ह एनकॅशमेंटवरील कर मर्यादा वाढवल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तीन लाख रुपयांपर्यंतच्या रजेच्या रोख रकमेवर खाजगी कर्मचार्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. तर यापेक्षा जास्त रकमेवर खासगी कर्मचाऱ्यांना कर भरावा लागतो. मात्र, आता ही मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.