
आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम (Thammineni Sitaram) यांनी गुरुवारी तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) दोन सदस्य आणि वायएसआर काँग्रेसच्या एका सदस्याची सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्याला दिवसभरासाठी निलंबित केले.
अमरावती : आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम (Thammineni Sitaram) यांनी गुरुवारी तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) दोन सदस्य आणि वायएसआर काँग्रेसच्या एका सदस्याची सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्याला दिवसभरासाठी निलंबित केले.
सभापतींनी हिंदूपूरचे आमदार आणि चित्रपट अभिनेता बाळकृष्ण यांना सभागृहात मिशीला पीळ देणे आणि ताव मारणे, असे कृत्य केल्याबद्दल कडक शब्दांत सुनावले होते. त्यांना सांगितले की, त्यांनी अस्वीकार्य टिप्पणी केल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर सध्या कारवाई करत नाही. मात्र, असे असभ्य वर्तन वारंवार खपवून घेतले जाणार नाही. निलंबनाच्या घोषणेनंतर सीताराम यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले.
टीडीपी आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडणारे विधिमंडळ कामकाज मंत्री बी. रेड्डी म्हणाले, सभापतींच्या स्पीकरच्या आसनासमोर जाऊन टेबलची काच फोडणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. सरकार टीडीपी आमदारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.
चंद्राबाबूंच्या सुटकेसाठी घोषणाबाजी
गुरुवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच टीडीपीचे सदस्य फलक घेऊन व्यासपीठाजवळ पोहोचले आणि त्यांनी सभापतींना घेराव घातला. कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.