temple like architecture under mosque

कर्नाटकातील (Karnataka)मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात २१ एप्रिल रोजी जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना (Temple - Like Architecture Found Under Mosque) सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.

    कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना (Temple – Like Architecture Found Under Mosque) सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.

    मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात २१ एप्रिल रोजी जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. मशिदीचा काही भाग आधीच पाडून नूतनीकरणाचे काम मशिदीच्या अधिकाऱ्यांकडून केले जात होते. काहींच्या मते, मशीद बांधण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर अस्तित्वात होते. कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

    दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीवरून वाद चांगलाच चिघळला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर होते. मंदिर पाडून याठिकाणी मशीद बांधल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच वझुखानामध्ये मिळालेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्यास अनुमती देण्यात यावी, नंदीच्या उत्तरेस असलेली भिंत तोडण्यात यावी, वझुखानामध्ये आढळलेल्या कथित शिवलिंगाची लांबी तसेच रुंदी मोजण्यासाठी सर्वेक्षण केले जावे, वझुखानाची वैकल्पिक सोय करावी, अशा मागण्या हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत केल्या आहेत.

    दुसरीकडे मुस्लिम पक्षानेदेखील काही मागण्या केल्या आहेत. वझुखाना बंद करण्यास मुस्लीम पक्षाने विरोध केला आहे. तसेच १९९१ अधिनियमाअंतर्गत ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण तसेच खटल्यावर या पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशीद प्रकरणातील गुंतागुंत आणि संवेदनशीलता लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने, हिंदू भाविकांनी दाखल केलेला दावा शुक्रवारी दिवाणी न्यायाधीशांकडून (वरिष्ठ) काढून तो वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी हस्तांतरीत केला होता.