
विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील ५ दिवस इंटरनेटवर पुन्हा बंदी घातली आहे
मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारानंतर (Manipur Violence) परिस्थिती थोडी सुधारत असल्याचे दिसत असताना पुन्हा एकदा इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र त्यानंतर जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. इंफाळमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून यानंतर मणिपूर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले.
न्यूयॉर्कमध्ये मणिपूरवर काय म्हणाले परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर?
इथे न्यूयॉर्कमध्ये मणिपूरवर परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर म्हणाले. एस जयशंकर म्हणाले, की मणिपूरमध्ये सुरु असलेल्या समस्येचा एक भाग म्हणजे तिथे येणाऱ्या स्थलांतरितांचा अस्थिर परिणाम. यामागे दीर्घकालीन इतिहास देखील आहेत. तेथे सामान्य स्थिती परत आणण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
गेल्या मंगळवारी 6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रांमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या मागे दोन सशस्त्र लोकही दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका फोटोमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह दिसत आहेत. 17 वर्षीय हिजाम लिंथोइंगम्बी आणि 20 वर्षीय फिजाम हेमजीत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील ५ दिवस इंटरनेटवर पुन्हा बंदी घातली आहे. घटनेची माहिती मिळताच सीबीआयच्या पथकाने तपास सुरू केला. यासोबतच राज्यात उपस्थित असलेल्या तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून दिल्लीतील काही वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचत आहेत.