soldier kill wife

गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी आज पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. रियाजच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये काही काळ शांतता प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी घटना वाढल्या आहेत. गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी आज पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. रियाजच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.

    स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद ठोकर हा त्याच्या गुडुरा येथील घरी उपस्थित होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात रियाझ अहमद यांची प्रकृती चिंताजनक होती.