दम है! ८३ वर्षांची वेटलिफ्टर आजी पाहून व्हाल थक्क

किरणबाईंचा नातू जिन ट्रेनर आहे. तोच आजीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना प्रशिक्षण देतो. त्याने आजीचे वर्कआऊट प्लॅन तयार केले आहेत. किरणबाईंचे संपूर्ण घरच जणू जिममध्ये रुपांतरीत झाले आहे. गेल्या वर्षी आजी पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना चालता येत नव्हते.

    काही जण व्यायामासाठी इतकी कारण देतात तर काही जण एक दोन दिवस व्यायाम करून सोडून देतात . मात्र प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही दररोज व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवू शकता. याचेच प्रत्यय म्हणजे ८३ वर्षांच्या आजी. त्यांचं वय हा निक्वळ एक आकडा आहे. मात्र इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की सगळे अवाक होतील. ८३ वर्षांच्या आजी या वेटलिफ्टर आहेत. या आजींचे नाव किरणबाई असून त्यांचे व्हिडियो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चेन्नईत राहणाऱया या आजींना कबड्डी आणि खो खो खेळांची आवड आहे. त्यांच्या नातवाने त्यांचे व्हिडियो, फोटो शेअर केले असून ते खूप व्हायरल होत आहेत.

    किरणबाईंचा नातू जिन ट्रेनर आहे. तोच आजीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना प्रशिक्षण देतो. त्याने आजीचे वर्कआऊट प्लॅन तयार केले आहेत. किरणबाईंचे संपूर्ण घरच जणू जिममध्ये रुपांतरीत झाले आहे. गेल्या वर्षी आजी पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना चालता येत नव्हते. त्यांनी जिद्दीने परिस्थितीला तोंड दिले. नातवाच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट सुरू केले.