नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त सरकार जारी करणार 75 रुपयांच नाणं; काय आहे याच वैशिष्ट्य, जाणून घ्या

नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल.

    नवी दिल्ली: आज  (28 मे) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्ताने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Union Ministry of Finance) एक निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी संसद भवनाच्या (New Parliament Building) नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त७५ रुपयांचे नाणे (75 rupees coin) जारी करण्याची घोषणा केली. या नाण्यावर नवीन संसद भवन संकुलाचे चित्र छापण्यात येणार आहे.

    जाणून घ्या कसे असेल 75 रुपयांचे नाणे

    अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 75 रुपयांचे हे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ 44 मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला 200 शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे. नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीनुसार करण्यात आली आहे.

    19 पक्षांचा उद्घाटनावर बहिष्कार

    आज (28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय विरोधी पक्ष काँग्रेसच्या बाजूनं उतरल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टी, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, तृणमूल काँग्रेस, राषअट्रीय जनता दल यासह अनेक पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहेत. संसद भवनाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन न करणे, राष्ट्रपतींना समारंभासाठी आमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की, सभापती हे संसदेचे संरक्षक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये.