रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या 60 वर्षीय कलाकाराचा रंगमंचावर मृत्यू!

रात्री एक वाजण्याच्या सुमारास सगळे रामलीला पाहण्यात गुंग होते. या दरम्यान,  रावणाची भुमिका साकारणाला कलाकार स्टेजवर अचानक बेशुद्ध झाला.

    अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील रुदौली कोतवाली अंतर्गत अयहार गावात रामलीला  नाटका दरम्यान रावणाची भूमिका साकरणाऱ्या कलाकाराचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पतीराम (वय, 60) असं या कलाकारचं नाव आहे.   या घटनेमुळे प्रेक्षकांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    नवरात्रोत्सवा निमित्त गावात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आयोजन करण्यात आलं होता. रविवारी रात्री अयहर गावात रामलीलाचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास सगळे रामलीला पाहण्यात गुंग होते. या दरम्यान,  रावणाची भुमिका साकारणाला कलाकार स्टेजवर अचानक बेशुद्ध झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. जिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या कलाकाराच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली.

    अनेक वर्षांपासून रावणाची भूमिका करत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी देवमती, दोन मुले व दोन मुली असा परिवार असून त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. घरातील सदस्यांची अवस्था वाईट आहे. गावचे प्रमुख प्रतिनिधी पुनीत कुमार साहू यांनी सांगितले की,