स्त्रीशक्तीचा जागर! महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष; राजपथावर साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन

महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांनी हा चित्ररथ सजविण्यात आला होता. कोल्हापूरची अंबाबाई माता, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणूकामाता आणि नाशकातील संप्तश्रृगी वणीच्या देवींचे दर्शन या चित्ररथातून साकारण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी पोतराज दिसून आला.

    नवी दिल्ली– आज देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना अमंलात आली, त्याची आठवण म्हणून आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीतील राजपथावर विविध राज्यांच्या वतीने चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथावर साडेतीन शक्तिपीठांचा देखावा करण्यात आला. हा देखावा लक्षवेधी तसेच सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

    स्त्री शक्तीचा जागर
    महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांनी हा चित्ररथ सजविण्यात आला होता. कोल्हापूरची अंबाबाई माता, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणूकामाता आणि नाशकातील संप्तश्रृगी वणीच्या देवींचे दर्शन या चित्ररथातून साकारण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी पोतराज दिसून आला. त्यामुळं महाराष्ट्राच्या चित्ररथातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथावर साडेतीन शक्तिपीठांचा देखावा करण्यात आला. हा देखावा लक्षवेधी तसेच सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

    महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा देखावा

    राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, देशातील विविध राज्यांनी आपापल्या परीने चित्ररथ साकरले होते. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ येताना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदा साडेतीन शक्तिपीठांचा देखावा दिसून आला. महाराष्ट्रात शक्तिपीठांना अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच राज्यातील भाविकांचे श्रदधास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ खूप सुरेख सजविण्यात आला होता.