अयोध्या दौरा हा राजकीय नाही, श्रद्धेचा विषय- आदित्य ठाकरे

    शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) तथा मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अयोध्या (Ayoddhya) दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते लखनऊ (Lucknow) विमानतळावर दाखल झाले असून लखनऊ विमानतळावरुन बाहेर येताच आदित्य ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत (Welcome Ceremony) करण्यात आले. यावेळी शेकडो शिवसैनिक (Shivsainik) स्वागतासाठी उपस्थित होते. लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, हा राजकीय दौरा नाही, तर श्रद्धेचा विषय आहे.

    आज आम्ही अयोध्येत दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. कुठलाही राजकीय विषय नाही, तर विषय आस्थेचा आहे. देवळात गेल्यावर मागणे मागण्यापेक्षा मी नेहमी आशीर्वाद घेत असतो. जी काही सेवा करण्याची आपल्याला संधी दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद बोलत असतो. यापुढे देशासाठी, समाजासाठी, राज्यासाठी जे काही कार्य घडायचे असेल ते चांगले होऊ द्या, असे मागत असतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.