सोन्याच्या बाबत सर्वात मोठी बातमी! यापुढे असं सोनं चालणारच नाही; केंद्र सरकारचा नवा नियम जारी

एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोनं, दागिन्यांची खरेदी-विक्रीही जोरात आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी.

नवी दिल्ली : एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोनं, दागिन्यांची खरेदी-विक्रीही जोरात आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. सोन्याबाबत केंद्र सरकारने नवा नियम बनवला आहे. या नियमानुसारच सोन्याची खरेदी-विक्री होईल. नाहीतर तुमचं सोनं ग्राह्यच धरलं जाणार नाही.

आता सरकारच्या नवीन नियमानुसार सोनं आणि सोन्याच्या दागिने 6 डिजीट अल्फान्युमेरिक HUID हॉलमार्क असल्याशिवाय सोन्याची विक्री करताच येणार नाही. म्हणजे असं सोनं इथूनपुढ ग्राह्य धरलं जाणार नाही. 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. असं सरकारन स्पष्टीकरण दिलं आहे

सोन्यावरील असणारी हॉलमार्किंग हा सोन्याची शुद्धता ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हॉलमार्क वर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी आकाराचे चिन्ह आहे. त्याचबरोबर हॉलमार्किंग केंद्राच्या लोगो बरोबरच सोन्याची शुद्धता सुध्दा लिहिलेली आहे.

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळेल.