सरकारी कर्मचाऱ्यांना होळीआधी मिळणार आनंदाची बातमी! केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएबाबत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने घोषणा केली की महागई भत्त्यामधील ३ हप्ते लवकरच दिले जातील. १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१चे हप्ते लवकरच दिले जाणार आहेत. गेल्यावर्षी १ जानेवारीपासून वाढीव दराने डीए दिले जाणे अपेक्षित होते. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

    केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावत होत आहे. सर्वात पहिले तेलंगणामधील कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के वाढीची घोषणा केली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवून ६१ वर्षे करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती की वेतन संशोधन आयोगाच्या शिफारशीनुसार लवकरच घोषणा केली जाईल.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएबाबत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने घोषणा केली की महागई भत्त्यामधील ३ हप्ते लवकरच दिले जातील. १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१चे हप्ते लवकरच दिले जाणार आहेत. गेल्यावर्षी १ जानेवारीपासून वाढीव दराने डीए दिले जाणे अपेक्षित होते. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

    कमी डीए मिळत असल्याने सध्या याचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्तीवेतनावर होत आहेकोरोना संकटामुळे महागाई भत्त्याची रक्कम देण्यापासून रोखण्यात आली होती. परंतु आता लाभार्थींना पूर्ण डीए म्हणजेच महागाई भत्ता देण्यास १ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

    त्रिपुरा सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता(डीए)मध्ये १ मार्च २०२१ पासून वाढीची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांच्या डीएमध्येही ३ टक्केही वाढ झाली आहे.