kapil sibbal

आम्ही त्यांच्यापैकी नाही आहोत, जे पक्षाची विचारसरणी सोडून इतर पक्षांत गेले. खरंतर हा विरोधाभास आहे. जे लोक यांचे खास होते, ते तर यांना सोडून गेले. आणि ज्यांना हे खास समजत नव्हते, ते लोक आजही यांच्यासोबत आहेत, अशा शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षांतर्गत गोंधळावरून काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

    सध्या काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. आधी पंजाबमध्ये राजकीय घडामोडी घडल्या त्यांनतर आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातील वादच चव्हाट्यावर आणला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही तर मग निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती नाही, अशी विचारणा करत त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी केली.

    आम्ही त्यांच्यापैकी नाही आहोत, जे पक्षाची विचारसरणी सोडून इतर पक्षांत गेले. खरंतर हा विरोधाभास आहे. जे लोक यांचे खास होते, ते तर यांना सोडून गेले. आणि ज्यांना हे खास समजत नव्हते, ते लोक आजही यांच्यासोबत आहेत, अशा शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षांतर्गत गोंधळावरून काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाचे निर्णय कोण घेत आहे, आम्हाला माहिती नाही. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, पण पक्षाच्या बाजूने आहोत. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. लोक पक्ष सोडत आहेत, ते काँग्रेस सोडून का जात आहेत, यावर आपण विचार केला पाहिजे. पंजाबबाबतही बैठकीत चर्चा व्हायला हवी, असे सिब्बल म्हणाले.