९ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडले, बंगळुरुतील धक्कादायक घटना, चौघांनी घेतली फाशी, तर लहानग्याचा भूकेने मृत्यू

एच शंकर नावाच्या व्यक्तीचे हे घर असून, घरात झालेल्या भांडणानंतर तो घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर त्याची पत्नी, मुलगा आणि दोन मुलींनी आत्महत्या केली आहे. तीन दिवसांपूर्वी हा सर्व प्रकार घडला होता. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा मृतदेह सडू लागले होते.

    बंगळुरु- बंगळुरुतील ब्यादारहल्ली परिसरात एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, यात एका ९ महिन्यांच्या लहानग्याचीही समावेश आहे. या घरात चार जणांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले, तर लाहनग्या ९ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू भूकेमुळे तडफडून झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहांसोबत तीन दिवस दोन वर्षांची चिमुरडी त्याच घरात होती. त्या मुलीला पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले आहे.

    एच शंकर नावाच्या व्यक्तीचे हे घर असून, घरात झालेल्या भांडणानंतर तो घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर त्याची पत्नी, मुलगा आणि दोन मुलींनी आत्महत्या केली आहे. तीन दिवसांपूर्वी हा सर्व प्रकार घडला होता. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा मृतदेह सडू लागले होते.

    धक्कादायक बाब म्णहजे आत्महत्या करताना दोन वर्षांची चिमुरडी आणि ९ महिन्यांच्या बाळांचे पुढे काय होणार, याचा विचारही या चौघांनी केला नाही. त्यांना त्याच अवस्थेत सोडून, या चौघांनी फाशी घेत आत्महत्या केली. यानंतर ९ महिन्यांच्या बाळाचा भूकेने तडफडून मृत्यू झाला आहे. बंगळुरु पोलीस आता याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.