पॅनकार्ड आधारला जोडण्याची (लिंक) डेडलाईन आता ३१ मार्च २०२२, यापूर्वी ३० सप्टेंबर होती शेवटची मुदत

३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय असल्याचे घोषित करण्यात येणार आहे. अशा पॅनकार्डचा वापर केल्यास १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत तुम्ही आपले आधार आणि पॅन कार्ड कमेकांना लिंक करण्याची आवश्यकता आहे.

  नवी दिल्ली- पॅन कार्डला आधार कार्डाशी जोडण्यासाठीची मुदत केंदंर सरकारने पुन्हा वाढवली आहे. यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख सांगण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत वाढ करुन, ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करता येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

  ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय असल्याचे घोषित करण्यात येणार आहे. अशा पॅनकार्डचा वापर केल्यास १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत तुम्ही आपले आधार आणि पॅन कार्ड कमेकांना लिंक करण्याची आवश्यकता आहे.

  तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का, हे कसे तपासाल

  १.     सर्वात पहिल्यांदा इन्कम टॅक्सच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या. incometax.gov

  २.     या वेबसाईटच्या पानावर अखेरच्या भागात लिंक आधार स्टेटस हा पर्याय आहे, तो निवडावा.

  ३.     त्यानंतर नवे पान उघडेल, त्या पानावर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून व्ह्यू आधार लिंक स्टेटस यावर क्लिक करावे.

  ४.     क्लिक केलेयानंतर तुमचे पॅनकार्ड, आधारकार्डाशी जोडले गेले आहे की नाही, याची माहिती तुम्हाला कळेल.

  एका मेसेजनी आधार पॅनशी लिंक करु शकाल

  १.     यासाठी तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये नवा मेसेज ओपन करावा लागेल.

  २.     त्यात UIDPAN हे टाईप करावे त्यानंतर स्पेस देऊन तुमचा आधार कार्डाचा नंबर, त्यानंतर पुन्हा स्पेस देऊन तुमचा पॅनकार्ड नंबर टाकावा

  ३.     हा मेसेज  567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

  ४.     यानंतर आयकर विभागाकडून आधार आणि पॅन कार्ड जोडणीची प्रक्रिया सुरु होईल.