india become worlds third largest economy will overtake japan

दिल्ली :  कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी शून्यावरून उणे २४ इतका खाली गेला.

दिल्ली :  कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी शून्यावरून उणे २४ इतका खाली गेला. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम जसजसे शिथिल करण्यात आले तसतशी अर्थव्यवस्था पुन्हा सुदृढतेकडे वाटचाल करू लागली आहे, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीवकुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये १० टक्के वाढेल, असे भाकित वर्तविले आहे.

२०२१ वर्षअखेरीस ‘प्री-कोविड’ स्थितीत
राजीवकुमार म्हणाले की, पुढच्या वर्षअखेरपर्यंत देशाची अर्थव्यवस्था कोरोना काळाच्या आधीसारखी (प्री-कोविड) होईल. तसेच २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत वाढ सकारात्मक दिसेल. दरम्यान, स्वामीनाथन एस अंकलेसरिया अय्यर यांनीदेखील आपल्या एका लेखात २०२१मध्ये अर्थव्यवस्था तेजीत दिसेल असे म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत उद्योगधंदे, व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने त्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागला.