आठ मुलांच्या पित्याने आठवीतील विद्यार्थिनीशी केले लग्न, घरी आणून मुलीवर केले अनन्वित अत्याचार

    जामतारा : एका आठ मुलांच्या पित्याने, वास्तव लपवून एका आठवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्नाचा घाट घातला. यानंतर तिला तो घरी घून आला आणि तिच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करवून आणू, अशा धमक्या तो तिला द्यायला लागला. मुलीने जेव्हा या सगळ्याला विरोध केला तेव्हा तिला मारहाणही करण्यात आली. ही मुलगी घरातून जीव वाचवून पळाली आणि तिची ही कहाणी जगासमोर ली. झारखंडच्या जामतारा येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

    प्रेमाचे नाटक रचून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले, याच वर्षी जानेवारीत कोर्टात रजिस्टर लग्न करुन या अल्पवयीन मुलीला हा नराधम घरी घेऊन आला. आपला नवरा आठ मुलांचा पिता आहे, हे ऐकल्यावर त्या मुलीला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर यावरुन या दोघांमध्ये सातत्याने वाद होत राहिले. मुलीला घरी नेण्यासाठी माहेरची मंडळी आली तेव्हा घटस्फोटापर्यंत वेळ येऊन ठेपली. मात्र स्थानिकांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता मिटवला. त्यानंतर मुलीला सोबत घून माहेरची मंडळी घरी रवाना झआली. काही दिवसांनी हा नराधम सासुरवाडीला गेला आणि प्रेमाचे नाटक रचून त्याने पुन्हा या मुलीला आपल्या घरी आणले. पीडित मुलीचे केले मुंडन आणि शॉक देऊन करीत असे मारहाण माहेरहून परत घरी आल्यावर काही दिवस ठीक गेले.

    मात्र नंतर तो तिला देह व्यापारासाठी उद्युक्त करु लागला, तशा धमक्याही देऊ लागला. तिने याला नकार दिल्यानंतर तो तिला मारहाण करु लागला. या मुलीने हे पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ट्रेन मिळू शकली नाही. स्थानिकांनी तिला पकडले आणि पुन्हा नवऱ्याच्य् स्वाधीन केले. तीला परत आणल्यानंतर या नराधम पतीने पत्नीला जनावराप्रमाणे मारले, इतकेच नाही तर तिचे मुंडन करुन तिची गावभर धिंडही काढण्यात आली. त्यानंतर शॉक देऊन तो तिला माराहाण करीत असे. या नराधमाने अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. या सर्व स्थितीत मुलीने पुन्हा एकदा धिटाईने पळ काढत, पत्रकारांपर्यंत हे सर्व पोहचवले. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.