बायजूवर ओढवलं आर्थिक संकट, कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते; संस्थापकावर घर गहाण ठेवण्याची ओढवली वेळ!

बायजू रवींद्रन यांच्याकडे बेंगळुरूमध्ये कुटुंबाच्या मालकीची दोन घरे आहेत आणि एप्सिलॉनमध्ये त्यांचा बांधकामाधीन व्हिला आहे, जो त्यांनी $12 दशलक्ष (सुमारे 100 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवला आहे.

  देशातील नांमाकित शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी BYJU’S विद्यार्थ्यांना शिक्षण देतं. सध्या या कंपनीचं दिवाळं निघालं आहे. त्यांची आर्थिक संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परिस्थिती अशी झाली आहे की त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसेही शिल्लक नव्हते. त्यामुळे बायजूचे संस्थापक रवींद्रन (raveendran) यांना त्यांचे घर गहाण ठेवाव लागलं. रवींद्रन यांनी बेंगळुरूमध्ये त्यांच्या मालकीची दोन घरे सुमारे 100 कोटी रुपये गहाण ठेवल्याची माहित समोर आली आहे.

  कंपनीवर आर्थिक संकट

  ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बायजूच्या कर्मचाऱ्यांचे पगार अडकले आहेत आणि कंपनीत रोखीची टंचाई वाढत आहे. कर्मचार्‍यांना पगार मिळण्यास विलंब होत असताना, बायजू रवींद्रन यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांचे घर गहाण ठेवून पैसे मिळवले, ज्यातून कर्मचार्‍यांना पगार दिला जाईल. सध्या बायजूवर मोठं आर्थिक संकट आलं आहे आणि कंपनीचं कर्ज देणाऱ्या संस्थांसोबत कायदेशीर लढाही सुरू आहे.

  100 कोटींना घर गहाण!

  मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्रन यांच्याकडे बंगळुरूमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची दोन घरे आहेत आणि एप्सिलॉनमध्ये त्यांचा बांधकामाधीन व्हिला आहे, ज्या त्यांनी $12 दशलक्ष (सुमारे 100 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवला आहेत. यातून मिळालेली रक्कम एडटेक कंपनीने थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड या मूळ कंपनीच्या १५ हजार कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी वापरली आहे. मात्र, या संदर्भात भायजूच्या व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  बायजूमध्ये विदेशी गुंतवणूक??

  आर्थिक संकटात अडकलेल्या बायजू FEMA देखील नव्या समस्येला तोंड देत आहे. अलीकडेच, ईडीच्या तपासात उघड झाले आहे की कंपनीला 2011 ते 2023 या कालावधीत सुमारे 28,000 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. कंपनीने याच कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,754 कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. या संदर्भात कंपनीच्या अनेक ठिकाणी झडती आणि जप्तीची कारवाईही करण्यात आली.