देशात कोरोनाबाधित रुग्णांनी गाठला उच्चांक, २४ तासांत आढळले ६९,६५२ रुग्ण

मागील २४ तासांत देशात कोरोनाची ६४,५३१ रुग्ण आढळले आहेत. तर १०९२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ लाख ६७ हाजारांहून अधिक झाला आहे. तसेच कोरोनावर २० लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वी मात केली आहे.

देशात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वेगाने पसरत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु ३१ मे नंतर देशात लॉकडाऊन मधील अटी शिथील करण्यात आल्या आहेत. तेव्हा पासून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात दिवसाला कोरोनाची ५० हजारांच्या वर प्रकरणे सापडत आहेत. 

मागील २४ तासांत देशात कोरोनाची ६४,५३१ रुग्ण आढळले आहेत. तर १०९२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ लाख ६७ हाजारांहून अधिक झाला आहे. तसेच कोरोनावर २० लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वी मात केली आहे. देशातील रिकव्हरी रेट वाढता असला तरी एकूण ५२,८८१ रुग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. यानुार देशातील कोरोना मृत्यू दर १.९१ टक्के आहे. देशात कोरोना संसर्ग वाढला असला तरी देशातील कोरोना मृत्यू दर कमी ठेवण्यात मात्र सरकारला यश मिळाले आहे.