Five killed due to alcohol poisoning in rajasthan

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलिस स्टेशन परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाचे ठरलेलं लग्न मोडलं आहे. दारुमुळे नवरीने लग्नाला नकार दिला(The husband drank The bride broke up the marriage)

    लखनौ : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलिस स्टेशन परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाचे ठरलेलं लग्न मोडलं आहे. दारुमुळे नवरीने लग्नाला नकार दिला(The husband drank The bride broke up the marriage)

    नवरदेव वरात घेवून निघाला. वधूच्या घरी म्हणजेच सासरच्या घरी न पोहोचता, थेट रुग्णालयात पोहोचला. नवरदेवाने आपली वरात मध्येच थांबवली आणि मित्रांसोबत दारू पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर नवरदेवाला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वधूच्या कुटुंबीयांना समजताच नवरीच्या घरात एकच खळबळ उडाली.

    मुलीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेऊन वराच्या प्रकृतीची माहिती घेतली. यादरम्यान दारू पिल्याने त्याची तब्येत बिघडल्याचे समजताच वधूने लग्नास नकार दिला यानंतर वरात लग्नाशिवायच माघारी परतली. हे संपूर्ण प्रकरण निचलौल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे.

    वधूपक्षाकडील लोकांनी वरातीत येणाऱ्या लोकांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण केली होती. सगळे नवरदेवाच्या येण्याची वाट पाहात होते, मात्र वरात घरी पोहोचण्याआधीच नवरदेव दारू पित असल्याचे समजले. नवरदेवाची तब्येत बिघडल्याने त्याला सीएससी निचलौलमध्ये दाखल करण्यात आले.