
आर्थिक उदारीकरणाचा सर्वाधिक फायदा हा श्रीमंतांना झाल्याचेही या हवालात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांच्या परिस्थितीतील सुधारणेचा दर मंद गतीने झाला आहे. त्यामुळे देशात आजही गरिबी तशीच असल्याचे अहवालात नमूद केले आहे. देशातील गरीब असलेल्या ५० टक्के लोकसंख्येकडे संपत्तीच्या नावावर काहीही नाही. त्यांची सरासरी संपत्ती ही ६६,२८० इतकीच आहे. एकूण संपत्तीतील हा वाटा केवळ ६ टक्के इतकाच आहे. मध्यमवर्गही गरीबच आहे, त्याची सरासरी संपत्ती ही ७,२३,९३० रुपये इतकीच आहे.
नवी दिल्ली – जगभरातील देशांमध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या दरीच्या पार्श्वभूमीवर, विश्व असमानता अहवाल-२०२२ मंगळवारी प्रकाशित झाला. जगभरातील १०० अर्थतज्ज्ञांनी विविध देशांच्या आर्थिक असमानतेचा अभ्यास करुन, हा अहवाल तयार केला आहे. भारतातही गरीब-श्रीमंत असमानता मोठ्या प्रमाणात असून, गरीब हा अधिक गरीब होत जातो आहे. तर दुसरीकडे देशात श्रीमंत माणसांची संख्याही सर्वाधिक आहे.
देशातील ५० टक्के लोकसंख्या ही वर्षाला सरासरी ५३, ६१० रुपये कमवते आहे. याचा अर्थ महिन्याचे त्यांचें उत्पन्न आहे केवळ ४४६७.५ रुपये. २०२१चा विचार केला तर देशातील ५० टक्के लोकसंख्येच्या कमाईत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना नंतरची आर्थिक स्थिती हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. या ५० टक्क्यांव्यतिरिक्त १० टक्के लोकसंख्येचे उत्पन्न २० पट अधिक आहे. ही लोकसंख्या वर्षाला ११,६६,५२० रुपये कमवते आहे. या अहवालाची प्रस्तावना नोबेल पुरस्कार विजेचे अभिजीत बॅनर्जी यांनी लिहिली आहे.
अर्ध्या लोकसंख्येची संपत्ती शून्यावर, तर श्रीमंतांकडे ६५ टक्के संपत्ती
आर्थिक उदारीकरणाचा सर्वाधिक फायदा हा श्रीमंतांना झाल्याचेही या हवालात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांच्या परिस्थितीतील सुधारणेचा दर मंद गतीने झाला आहे. त्यामुळे देशात आजही गरिबी तशीच असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
देशातील गरीब असलेल्या ५० टक्के लोकसंख्येकडे संपत्तीच्या नावावर काहीही नाही. त्यांची सरासरी संपत्ती ही ६६,२८० इतकीच आहे. एकूण संपत्तीतील हा वाटा केवळ ६ टक्के इतकाच आहे. मध्यमवर्गही गरीबच आहे, त्याची सरासरी संपत्ती ही ७,२३,९३० रुपये इतकीच आहे. एकूण संपत्तीतील मध्यमवर्गीयांचा वाटा हा २९.५ टक्के इतका आहे. इतर १० टक्के लोकसंख्येकडे सरासरी संपत्ती ही ६३,५४,०७० रुपयांची सरासरी संपत्ती आहे. हा एकूण संपत्तीतील ६५ टक्के वाटा आहे. तर एक टक्के लोकसंख्येकडे सरासरी ३,२४,४९,३६० रुपयांची संपत्ती आहे. ही एकूण संपत्तीच्या ३३ टक्के आहे.