पंतप्रधान मोदींनी घेतली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक, जनरल नरवणे असू शकतात रावत यांचे उत्तराधिकारी

बिपीन रावत यांच्या निधनाच्या बातमीने सरकार आणि देश दोघेही हादरले असले तरी प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत बिपिन रावत यांच्या जागी नवीन सीडीएसच्या नावावर चर्चा झाली. सेवाज्येष्ठतेनुसार जनरल एम एम नरवणे यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.

    8 डिसेंबर हा दिवस देशासाठी मोठ्या अपघाताचा दिवस ठरला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आता या रिक्त पदाचे दावेदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशाच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर येणार? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

    बिपीन रावत यांच्या निधनाच्या बातमीने सरकार आणि देश दोघेही हादरले असले तरी प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत बिपिन रावत यांच्या जागी नवीन सीडीएसच्या नावावर चर्चा झाली. सेवाज्येष्ठतेनुसार जनरल एम एम नरवणे यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.

    कोण आहेत एमएम नरवणे?

    जनरल नरवणे हे सध्या लष्करप्रमुख आहेत. याआधी ते लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रमुख होते. 4 दशकांच्या कार्यकाळात नरवणे यांनी अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. काश्मीर ते ईशान्येकडील राज्यांमध्ये तैनात असताना दहशतवादी कारवाया रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरवणे हे 1987 मध्ये श्रीलंकेत आयोजित केलेल्या ऑपरेशन पवनमध्ये शांतता राखणाऱ्या दलाचा एक भाग होते. जनरल एमएम नरवणे यांनी १ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.