प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ही घटना मंगळवारी घडली. मंगळवारी रामाच्या चरणी योग-दिनाचा सराव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हजेरी लावली. मंत्री निघाल्यानंतर दोन तासांनी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा यासंबंधीचे दोन व्हिडिओही समोर आले. यामध्ये पती आंघोळ करताना पत्नीचे चुंबन घेताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये त्याला मारहाण केली जात आहे.

    नवी दिल्ली – अयोध्येत राम पायरीवर स्नान करतांना पतीने पत्नीचे चुंबन घेतले. हे पाहून तेथे उपस्थित अनेकांनी आक्षेप घेत येथे असे प्रकार चालणार नाही म्हणत त्यांना ठणकावले. लोक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आधी पतीला कालव्याच्या पाण्यात ओढून बेदम मारहाण केली.

    ही घटना मंगळवारी घडली. मंगळवारी रामाच्या चरणी योग-दिनाचा सराव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हजेरी लावली. मंत्री निघाल्यानंतर दोन तासांनी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा यासंबंधीचे दोन व्हिडिओही समोर आले. यामध्ये पती आंघोळ करताना पत्नीचे चुंबन घेताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये त्याला मारहाण केली जात आहे. हा व्हिडीओ दिव्य मराठीकडेही आहे, पण मीडिया एथिक्समुळे आम्ही तो जशास तसा दाखवू शकत नाही.

    सुमारे ३० वर्षांच्या पतीला २-३ जणांनी २० मिनिटे बेदम मारहाण केली. त्याच्या चेहऱ्याला, खांद्यावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. यादरम्यान पत्नी रडत-रडत पतीच्या सुटकेसाठी विनवणी करत होती, मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. तेथे उपस्थित इतर लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले.

    आक्षेप घेणाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते, त्यामुळे पती-पत्नीकडून अश्लीलता पसरवणे त्यांना सहन झाले नाही. यावर लोकांनी आक्षेप घेत सार्वजनिक ठिकाणी असे असभ्य वर्तन करू नये, असे सांगितले. माहिती मिळताच पोहोचलेल्या लक्ष्मण घाट चौकीच्या पोलिसांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला.