आईने मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले, चिमुकलीचा जागेवरच मृत्यू

ही घटना सेंट्रल बंगळुरूच्या संपनगिरामानगर येथील अद्वैत आश्रय अपार्टमेंटमधील आहे. ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला मुलीला कडेवर घेऊन बाल्कनीत आली आणि काही वेळाने तिला खाली फेकून दिले. यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला आणि स्वत: उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी तीला वाचवले.

    नवी दिल्ली – बंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या ४ वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आणि यानंतर महिला स्वत: बाल्कनीच्या रेलिंगवर बसली. मुलीला फेकून देऊन आपण रेलिंगवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सुषमा भारद्वाज असे या महिलेचे नाव असून, दृती बालकृष्णन असे मुलीचे नाव आहे.

    ही घटना सेंट्रल बंगळुरूच्या संपनगिरामानगर येथील अद्वैत आश्रय अपार्टमेंटमधील आहे. ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला मुलीला कडेवर घेऊन बाल्कनीत आली आणि काही वेळाने तिला खाली फेकून दिले. यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला आणि स्वत: उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी तीला वाचवले.

    ही महिला व्यवसायाने डेंटिस्ट आहे, तर तिचा पती किरण बालकृष्ण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि श्रवणशक्ती कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे महिला चिंतेत होती. ती तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकत नव्हती आणि त्यासाठी मुलीला दोष देत असे. त्यामुळे तिने मुलीच्या हत्येचे पाऊल उचलले.