देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 47 वर

सध्या देशात एकूण संक्रमणांपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहे म्हणजे 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये 181 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे.

    नवी दिल्ली  : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 210 नवीन कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४.४६ कोटी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 47 वर आली आहे.

    गेल्या 24 तासात देशात केरळमध्ये एका मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे आतापर्यंत 5,30,654 लोकांनी आपला जीव गमावला आहे.  सध्या देशात एकूण संक्रमणांपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहे म्हणजे 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये 181 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. तर कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत 4,41,39,948 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवण्यात आले आहे.

    देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.96 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारताने 4 मे रोजी दोन कोटी, गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटी आणि या वर्षी 25 जानेवारी रोजी चार कोटी कोरोनाव्हायरस प्रकरणांचा गंभीर टप्पा पार केला.