
देशातील एकूण संसर्गापैकी ०.०२ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत आणि कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ही कमी होणारी वाढ दिलासा देणारी ठरतेय. गेल्या 24 तासात देशात ५०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णवाढीसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,46,66,676 वर पोहोचली आहेत.
सध्या दे
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वर आली आहे. देशात गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दिल्ली आणि राजस्थानमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या संख्येसह देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,535 वर पोहोचली आहे. मंगळवारी (15 नोव्हेंबर) गेल्या 24 तासात देशात 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
देशातील एकूण संसर्गापैकी ०.०२ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत आणि कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,28,580 वर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवण्यात आले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसींचे 219.82 कोटी डोस देण्यात आले आहेत.