दिलासादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय घट

देशात गेल्या 24 तासांत 7,591 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचं पाहायला मिळालं.

    देशात सणासुदीच्या दिवसात दिलासा देणारी बातमी आहे. काही दिवसापासून सतत वाढणारी रुग्णसंख्या आता कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात 7 हजार 591 कोरोना (corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

    देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहत चिंता व्यक्त करण्यात येत होती मात्र, आता ही रुग्णसंख्या कमी झाल्याचं सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 7,591 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, आणखी एक दिलासा देणारी बातमी म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 27 हजार 597 जणांचा मृत्यू झाला आहे.