देशातील कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4,434 वर

देशात गेल्या 24 तासात केरळमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना रुग्णांची मृतांची संख्या 5,30,630 वर पोहोचली आहे,

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना (Corona Cases In India) रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 226 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्येतही घट झाल्याच पाहायला मिळत आहे. देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत 95 ने घट झाली असून  सध्या देशात 4  हजार 434  रुग्ण आहेत. या रुग्णसंख्येसह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4.46 कोटीवर पोहोचली आहे.

    देशात गेल्या 24 तासात केरळमध्ये  दोन जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना रुग्णांची मृतांची संख्या 5,30,630 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या एकूण संख्येपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-१९ पुनर्प्राप्तीचा दर ९८.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अशी माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांंची संख्या 4,41,38,554 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवण्यात आली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 219.94 कोटी डोस देण्यात आले आहेत.