बुरख्यावर स्विगीची बॅग घेऊन होम डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा फोटो होतोय व्हायरल, दररोज पोटासाठी करतेय 25 किमीची पायपीट

बुरखा घातलेली एक महिला खांद्यावर स्विगीची (Swiggy) बॅग (Bag) घेऊन लखनौच्या (Lucknow) बाजारातून जाताना दिसते. कुणीतरी तिचे फोटो काढतं. आणि सध्या सोशल मीडियावर या महिलेचे फोटो व्हायरल होतात. या फोटोकडे पाहून प्रत्येक जण त्याचा-त्याचा निष्कर्ष काढतोय.

  लखनौ : बुरखा घातलेली एक महिला खांद्यावर स्विगीची (Swiggy) बॅग (Bag) घेऊन लखनौच्या (Lucknow) बाजारातून जाताना दिसते. कुणीतरी तिचे फोटो काढतं. आणि सध्या सोशल मीडियावर या महिलेचे फोटो व्हायरल होतात. या फोटोकडे पाहून प्रत्येक जण त्याचा-त्याचा निष्कर्ष काढतोय. काही जण ती स्विगी कंपनीची एजंट असल्याचं म्हणतायेत, तर काहीजण तिला रहस्यमयी महिला म्हणून संबोधतायेत. तर्क काहीही असोत, मात्र वास्तव वेगळंच आहे. या महिलेचं नाव आहे रिजवाना. रिजवाना लखनौच्याच चौक परिसरात एका गल्लीत लहानशा घरात राहते. १६ बाय ८च्या असलेल्या तिच्या घरात एका बाजूला किचन आहे तर दुसऱ्या बाजूला संडास. परिस्थितीमुळे तिला स्विगीसाठी काम करण्याची वेळ आलीय.

  दररोज पोटासाठी २५ किमीची वणवण

  घरात बाथरुम नसल्यानं घर बंद करुन घरातच ती आणि तिचा लहानगा मुलगा दररोज अंघोळ करतात. घराताच एका दोरीवर कपडे वाळत टाकले जातात. कुडकुडत्या थंडीत आपली स्विगीची बॅग घेून सकाळी ८ वाजता रिजवाना आपल्या कामासाठी बाहेर पडते. तिच्या आार्थिक परिस्थितीमुळे, तिच्याकडं फिरण्यासाठी टू व्हिलरपण नाही. ती दररोज पोटासाठी २५ किमी पायी प्रवास करत शहरात फिरत असते. तुमच्या माहितीसाठी ती स्विगीत कामही करत नाही. डालीगंज परिसरात तिनं एका माणसाकडून ही स्विगीची बॅग ५० रुपयांना खरेदी केली होती. त्या बॅगेत प्लास्टिकचे चमचे, प्लेट, चहाचे कप घेून ती शहरात फिरत असते. दुकानदारांकडे जाऊन या वस्तू त्यांना विकण्याचा तिचा प्रयत्न असतो.

  आर्थिक ओढाताणीत चालवते घर

  रिजवानानं तिच्या संघर्षाची कहाणी सांगितली. त्यात तिनं सांगितलं की ती काही जणांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचंही काम करते. यासाठी तिला महिन्याचे ३ हजार रुपये मिळतात. तर या वस्तू मिळून तिला वरती ३ हजार मिळतात. रिजवानाचं साधारण मासिक उत्पन्न हे ५ ते ६ हजार आहे. इतक्या कमी उत्पन्नात घर कसं चालवायंच हा तिच्यासमोरचा प्रश्न असतो. तिच्या घरात ती धरुन ४ जणं आहेत. त्यात दोन मुली आणि एक मुलगा आहे. आणखी एका मोठ्या मुलीचं लग्न आधीच झालेलं आहे. रिजवानाचा पती गेल्या ३ वर्षांपासून बेपत्ता आहे. तो रिक्षा चालवित असे, त्याची खूप शोधाशोध केली, मात्र त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.

  तिच्या परिश्रमाचं होतंय कौतुक

  पती एक दिवस परत येईल आणि पुन्हा पूर्वीसारखं मोकळं आयुष्य जगता येईल, या आशेवर रिजवाना दिवस काढतेय. सरकारकडे राहण्यासाठी घराची मागणीही तिनं केलीय. हक्काचं छप्पर असेल तर पोटापाण्याची गुजराण करता येते, असं रिजवानाचं म्हणणंय. इतक्या वाीट काळातही कधी कुणापुढे मदतीसाठी हात पसरले नसल्याचं ती अभिमानानं सांगते. तिच्या आजूबाजडूला राहणारेही तिच्या या परिश्रमांचं कौतुक करतायेत.