बापरे! जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्यावर, भारत ‘या’ स्थानी

आज 15 नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीवरची लोकसंख्या तब्बल 800 कोटींच्यावर पोहचली आहे. तर सध्या जगात चीन हा देश सर्वांधिक लोकसंख्येचा देश आहे, तर आगामी काळात म्हणजे 2023-2024 पर्यंत भारत लोकसंख्येत चीनला देखील मागे टाकील असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनुष्य जंगल, पाणी आणि जमीन या नैसर्गिक (Nature) गोष्टींवर अवलंबून असतो. भविष्यात या गोष्टींसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

    नवी दिल्ली जगासमोर वाढती लोकसंख्या (Population) एक आव्हान आहे, लोकसंख्येचा विस्फोट होतोय असं नेहमी सांगितलं जात. ज्या देशाची लोकसंख्या कमी तिथला विकासदर सुद्धा अधिक असतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, जगातील लोकसंख्येच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरम्यान, एका अहवालानुसार आज 15 नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीवरची लोकसंख्या तब्बल 800 कोटींच्यावर पोहचली आहे. तर सध्या जगात चीन हा देश सर्वांधिक लोकसंख्येचा देश आहे, तर आगामी काळात म्हणजे 2023-2024 पर्यंत भारत लोकसंख्येत चीनला देखील मागे टाकील असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनुष्य जंगल, पाणी आणि जमीन या नैसर्गिक (Nature) गोष्टींवर अवलंबून असतो. भविष्यात या गोष्टींसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

    दरम्यान, मागील बारा वर्षांआधी लोकसंख्या 700 कोटी होती, जी आता 800 करोडवर पोहोचली आहे. मागील 12 वर्षात लोकसंख्येत तब्बल 100 कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळं एवढी अवाढव्य लोकसंख्येचा भार पृथ्वी सहन करु शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्सच्या (World Population Prospects) मते ज्या देशात प्रजनन दर (Fertility Rate) जास्त आहे, त्या देशांना धोका अधिक आहे. जमिनीसाठी नैसर्गिक जंगलं तोडून मनुष्य नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देत आहे. कार्बन उत्सर्जन वाढल्याने पृथ्वीवरील हिमनद्या पाण्यात बदलतील आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. UN DESA च्या वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्स 2022 अहवालानुसार सन 2037 पर्यंत लोकसंख्या 900 कोटी आणि 2058 पर्यंत लोकसंख्येने 1000 कोटीचा टप्पा पार केला असेल.